मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

दि.01/02/2017 ते 15/02/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत

             

जाहिर आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग

दि.01/02/2017 ते 15/02/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत


 निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांचेकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवडा दि.01 फेब्रवारी 2017 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपध्दती ,उपलब्ध सेवा याबाबत सर्व स्तरावर (सभासद/आहरण व संवितरण अधिकारी) त्यांच्याकडे जागरूकता येणे आवश्यक आहे. तरी राष्ट्रीय निवृत्तीवेतनच्या सर्व सभासदांना व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.


1. सर्व सभासदांची नोंदणी पूर्ण करणे.त्यासाठी सीएसआरएफ फॉर्म भरण्याची कार्यवाही पूर्ण करणे

2.  सर्व सभासद IRA-COMPLIANT असणे आवश्यक असल्याने त्यासाठीची प्रलंबित कार्यवाही पूर्ण करणे.

3.  सभासदांची माहिती/तपशिल एस-2 फॉर्मद्वारे अदयावत करणे.

4. सभासदांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, नामनिर्देशन,बँक तपशील इत्यादी माहिती अद्ययावत करणे व सभासदांचे वेतनातून अंशदाने नियमीतरित्या कपात करणेची जबाबदारीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

5. एनपीएस संबंधीत उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवेबाबतची माहिती देणे.

6. सर्व सभासदांनी त्यांचे I-PIN/T-PIN चा वापर करून अद्ययावत माहिती प्राप्त करून घेणेसाठी जागरूक करणे.

7. सर्व सभासदांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून मोबाईल ॲप सुविधेचा वापर करणेसाठी प्रोत्साहित करणे. यामुळे सर्व सभासदांना   त्यांचेशी संबंधीत माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकेल.

8. दि.01.04.2015 नंतर सेवासमाप्ती झालेल्या कर्मचा-यांना ऑनलाईन पध्दतीने Withdrawal Request पाठविणेबाबतची कार्यवाही विहीत कार्यपध्दतीबाबत.
 
(तसेच वरील सर्व मुददयाबांबत मार्गदर्शण करण्यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित
करण्यात आलेले आहे.)
                                  
                                                                                                   जिल्हा कोषागार अधिकारी
                                                                                                        रायगड अलिबाग..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा