सोमवार, २३ जुलै, २०१८

जिल्हा कोषागार कार्यालय रायगड यांजकडे माहे जुलै 2018 ची प्राप्त निवृत्तीवेतन प्रदान आदेशांची यादी



                        दि.03/07/2017 रोजी प्राप्त निवृत्तीवेतन प्रदान आदेशांची यादी 
SR No. Pensioner name PPO NAME RECEIVED DATE
1 SANTOSH HIRAMAN PATIL M111803370803 03-07-18
2 SUREKHA CHANDRAKANT KAMBLE M111803370867 03-07-18
3 CHANDRAKANT SHANKAR PATIL M111803370416 03-07-18
4 SANGITA SANDIP BHOIR M141808370076 03-07-18
5 ASHA A NAIK M141808368612 03-07-18
6 SURESH PARSHURAM KHAPNE M111801368898 03-07-18
7 PANKAJ KUNJILAL SHARMA M111801369838 03-07-18
8 YASHWANT DATTATRAY CHAVAN M111801368438 03-07-18
9 SUSHMA PREMNATH PATIL M111801370372 03-07-18
10 NATHURAM TUKARAM GHOLAP M111801370325 03-07-18
11 HIRABAI BALKRISHNA PULEKAR M111801369405 03-07-18
12 NARAYAN NAMADEO WARE M111801370083 03-07-18
13 VILAS AMRUT PATIL M111801370823 03-07-18
14 ASHOK MAHADEV MORE M111801369891 03-07-18
15 ARUN PANDURANG SONAWALE M111801370176 03-07-18
16 SANDIP KAMALAKAR GOTHIVAREKAR M111801370374 03-07-18
17 PARSHURAM MARABA BAJI M111801369794 03-07-18
18 NARESH ANANT BHAT M111801369338 03-07-18

गुरुवार, २९ जून, २०१७

दि.27/06/2017 ते 11/07/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत


जाहिर आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग

दि.27/06/2017 ते 11/07/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत

 

                    निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांचेकडील सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवडा दि.27 जुन 2017 ते 11 जुलै 2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपध्दती ,उपलब्ध सेवा याबाबत सर्व स्तरावर (सभासद/आहरण व संवितरण अधिकारी) त्यांच्याकडे जागरूकता येणे आवश्यक आहे. तरी राष्ट्रीय निवृत्तीवेतनच्या सर्व सभासदांना व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

1. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील अधिकारी/कर्मचारी यांचे प्राण खातेवरील वैयक्तीक माहिती अदयावत करण्यासाठी एस-2 फॉर्म भरून कोषागारात सादर करणे.

2. सर्व सभासदांनी प्राण खात्यावर  नामनिर्देशन(Nomination) आहे किंवा नाही याची खात्री करावी नसल्यास नामनिर्देशन (Nomination) कोषागारास कळवून त्याची नोंदणी करून घेणे..

3. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्याच्याबाबत Exit withdrawal बाबतची कार्यवाही करून आवश्यक ती कागदपत्रे कोषागारात सादर करणे.

4. सर्व आहरण व संतिवरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की एनपीएस  सभासदांचे Partial withdrawal बाबतची मागणी केली असल्यास त्याबाबतचे दस्तएैवजांची/कागदपत्रांची पुर्तता करून घेणे व ती जिल्हा कोषागारास सादर करावी.

         सदर मुद्दयाबाबत  जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग व तालुका स्तरावरील उपकोषागार कार्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून सर्व एनपीएस योजनेतील सभासदांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत आव्हान करण्यात येत आहे.

 

जिल्हा कोषागार अधिकारी,

रायगड-अलिबाग

गुरुवार, ४ मे, २०१७

आहरण व संवितरण अधिकारी व मुद्रांक विक्रेते यांना जाहीर आवाहन

 
जिल्हा कोषागार कार्यालय  रायगड -  अलिबाग
                                        जाहीर आवाहन

                                     सर्व आहरण व संवितरण अधिकारी
                                      कार्यालयांसाठी  महत्वाची सुचना.

  वित्त विभाग व संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या दिनांक 03/05/2017 च्या परिपत्रकानुसार वित्त विभागामार्फत  राबविण्यात येणाऱ्या प्रणालीचे अनुषंगाने बिम्स, ग्रास, सेवार्थ, (NPS, LOAD AND ADVANCES, GIS) निवृत्तीवेतन, बीलपोर्टल, वेतनिका, कोषावाहिनी, अर्थवाहिनी ई. प्रणालीत नवीन पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालील कालावधीत संबंधित प्रणालीचे अदयावतीकरण करण्याचे कामकाज सुरू ठेवण्याचे असल्याने खालीलप्रमाणे प्रणाली बंद राहणार असल्याने वेतनदेयके, बीम्सप्रणालीतून निघणारे प्राधिकारपत्रे, बीलपोर्टल प्रणालीव्दारे तयार होणारी देयके, कोषागारात ४ व ५ मे 2017 रोजी लवकरात लवकर सादर करावीत जेणेकरून कोषागारात सादर केलेली देयके पारीत करून विनाविलंब वेतनाचे  प्रदान करणे सोयीस्कर होईल.

अ.क्र
प्रणालीचे नाव
      प्रणाली बंद असण्याचा  कालावधी
1)
बीम्स, सेवार्थ (एनपीएस, कर्जे व अग्रीमे, गट ड भविष्य निर्वाह  निधी) निवृत्तीवेतन, बील पोर्टल, वेतनिका, कोषवाहिनी, अर्थवाहिनी
शनिवार दिनांक 06/05/2017 संध्याकाळी 06.00 वाजेपासून
गुरूवार दिनांक 11/05/2017  सकाळी 10.00 वाजेपर्यंत
2)
ग्रास
शुक्रवार दिनांक 12/05/2017  संध्याकाळी 06.00 वाजेपासून
रविवार दिनांक 14/05/2017 संध्याकाळी 06/.00 पर्यंत

            मुद्रांक विक्रेते यांना आवाहन :-
 हस्तलिखित पध्दतीने असलेल्या चलनांना पूर्वीची  पध्दत उपरोक्त कालावधीत लागू राहणार आहे. मुद्रांकांची विक्री हस्तलिखित चलनांच्या अनुषंगाने करण्यात येईल असे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                          जिल्हा कोषागार अधिकारी

                                                                रायगड अलिबाग..

                                  

 

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

दि.01/02/2017 ते 15/02/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत

             

जाहिर आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग

दि.01/02/2017 ते 15/02/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत


 निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांचेकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवडा दि.01 फेब्रवारी 2017 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपध्दती ,उपलब्ध सेवा याबाबत सर्व स्तरावर (सभासद/आहरण व संवितरण अधिकारी) त्यांच्याकडे जागरूकता येणे आवश्यक आहे. तरी राष्ट्रीय निवृत्तीवेतनच्या सर्व सभासदांना व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.


1. सर्व सभासदांची नोंदणी पूर्ण करणे.त्यासाठी सीएसआरएफ फॉर्म भरण्याची कार्यवाही पूर्ण करणे

2.  सर्व सभासद IRA-COMPLIANT असणे आवश्यक असल्याने त्यासाठीची प्रलंबित कार्यवाही पूर्ण करणे.

3.  सभासदांची माहिती/तपशिल एस-2 फॉर्मद्वारे अदयावत करणे.

4. सभासदांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, नामनिर्देशन,बँक तपशील इत्यादी माहिती अद्ययावत करणे व सभासदांचे वेतनातून अंशदाने नियमीतरित्या कपात करणेची जबाबदारीबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करणे.

5. एनपीएस संबंधीत उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवेबाबतची माहिती देणे.

6. सर्व सभासदांनी त्यांचे I-PIN/T-PIN चा वापर करून अद्ययावत माहिती प्राप्त करून घेणेसाठी जागरूक करणे.

7. सर्व सभासदांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून मोबाईल ॲप सुविधेचा वापर करणेसाठी प्रोत्साहित करणे. यामुळे सर्व सभासदांना   त्यांचेशी संबंधीत माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकेल.

8. दि.01.04.2015 नंतर सेवासमाप्ती झालेल्या कर्मचा-यांना ऑनलाईन पध्दतीने Withdrawal Request पाठविणेबाबतची कार्यवाही विहीत कार्यपध्दतीबाबत.
 
(तसेच वरील सर्व मुददयाबांबत मार्गदर्शण करण्यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित
करण्यात आलेले आहे.)
                                  
                                                                                                   जिल्हा कोषागार अधिकारी
                                                                                                        रायगड अलिबाग..

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

जाहिर अवाहन
जिल्हा कोषागार कार्यालय रायगड अलिबाग.


                            वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2015/प्रक्रमांक/24/कोषा/प्रशा/5 दिनांक 15/01/2016 अन्वये राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक /कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे करीता जीवन प्रमाण (DIGITAL LFIE CERFITICATE) सुविधा उपलब्ध झालेली आहे. तरी जिल्हा कोषागार कार्यालय अलिबाग यांचे मार्फत निवृत्तीवेतन /कुटुंब  निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की आपण आधार कार्ड, निवृत्तीवेतन आदेश क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल इ. घेवून आपआपल्या तालुक्यातील कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयात जावून नाव नोदंणी करून घ्यावे असे आवाहन श्री. मंगेश गावडे कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे.


                                    जिल्हा कोषागार अधिकारी
                                       रायगड अलिबाग..



गुरुवार, ५ मे, २०१६

रायगड कोषागार कार्यालयाला राजीव गांधी गतिमानता प्रशासन पुरस्कार 2015










रायगड कोषागार कार्यालयाला राजीव गांधी गतिमानता प्रशासन पुरस्कार 2015 मिळाल्याबददल रायगड कोषागार कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांचे मन:पुर्वक अभिनंदन..... झी 24 तास वरील बातमी