गुरुवार, २९ जून, २०१७

दि.27/06/2017 ते 11/07/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत


जाहिर आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग

दि.27/06/2017 ते 11/07/2017 एनपीएस पंधरवडा साजरा करणेबाबत

 

                    निवृत्तीवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांचेकडील सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा पंधरवडा दि.27 जुन 2017 ते 11 जुलै 2017 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपध्दती ,उपलब्ध सेवा याबाबत सर्व स्तरावर (सभासद/आहरण व संवितरण अधिकारी) त्यांच्याकडे जागरूकता येणे आवश्यक आहे. तरी राष्ट्रीय निवृत्तीवेतनच्या सर्व सभासदांना व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

1. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील अधिकारी/कर्मचारी यांचे प्राण खातेवरील वैयक्तीक माहिती अदयावत करण्यासाठी एस-2 फॉर्म भरून कोषागारात सादर करणे.

2. सर्व सभासदांनी प्राण खात्यावर  नामनिर्देशन(Nomination) आहे किंवा नाही याची खात्री करावी नसल्यास नामनिर्देशन (Nomination) कोषागारास कळवून त्याची नोंदणी करून घेणे..

3. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्याच्याबाबत Exit withdrawal बाबतची कार्यवाही करून आवश्यक ती कागदपत्रे कोषागारात सादर करणे.

4. सर्व आहरण व संतिवरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की एनपीएस  सभासदांचे Partial withdrawal बाबतची मागणी केली असल्यास त्याबाबतचे दस्तएैवजांची/कागदपत्रांची पुर्तता करून घेणे व ती जिल्हा कोषागारास सादर करावी.

         सदर मुद्दयाबाबत  जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग व तालुका स्तरावरील उपकोषागार कार्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून सर्व एनपीएस योजनेतील सभासदांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत आव्हान करण्यात येत आहे.

 

जिल्हा कोषागार अधिकारी,

रायगड-अलिबाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा